महत्वाची माहिती: :

ऑनलाइन शिक्षणासाठी या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र बोर्डाचा शालेय अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे शैक्षणिक साहित्य इथे अभ्यासण्यास मिळेल. प्राथमिक वर्गांचे ऑनलाइन शिक्षण करताना पालकांची भूमिका जास्त महत्वाची असते. म्हणून प्राथमिक इयत्तासाठी दिलेला अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पालकांसाठी दिलेला आहे ज्याचा वापर करून ते स्वत: आपल्या पाल्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू ठेऊ शकतील. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाने बाजारातील महागडे एप्स विद्यार्थी व पालकांचे आर्थिक कंबरडे मोडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सर्वांना परवडणारे व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या सामाजिक हेतूने हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. कमीत कमी खर्चात व संसाधणे वापरुन हा प्लॅटफॉर्म जनहित डोळ्यासमोर ठेऊन चालू झालेला आहे. समाजातील बरेच प्रतिष्ठित शिक्षक, शिक्षणतज्ञ, सुजाण नागरिक यांच्या सहकार्याने हे काम पुढे जात आहे. शाळेत किंवा वर्गात ज्याप्रमाणे अभ्यासक्रम पुढे जातो तशा प्रकारे हळूहळू अभ्यासक्रम उपलब्ध होईल, एकदाच सर्व गोष्टी दाखवून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे टाळले आहे. हा प्लॅटफॉर्म वापरताना पाठात दिलेल्या सूचनेनुसार आपल्या शाळेतील शिक्षकांची, पालकांची, इतर विद्यार्थ्यांची मदत घेणे, संवाद साधणे अपेक्षित आहे. सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता व जीवन कौशल्ये विकासासाठी हे आवश्यक आहे. तसेच शाळा व शिक्षकांना पर्याय उभा करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश्य नसून त्यांना अधिक मदत करणे हा या प्लॅटफॉर्मचा हेतु आहे हा प्लॅटफॉर्म कोविड -19 डोळ्यासमोर ठेऊन बनवलेला नसून, त्यानंतरही ऑनलाइन शिक्षणाची साधने कायम सर्वांनाच मिळावीत, सर्वांना स्पर्धेत न्याय्य संधि मिळावी या हेतूने तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात काही बदल सुचवायचा असेल, काही चूक दुरुस्त करायची असेल, काही नवीन सुचवायचे असेल तर आम्हाला contact.vschool@gmail.com या ईमेल वर लिहा.